Nothing Special   »   [go: up one dir, main page]

Jump to content

बीजिंग दाशिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बीजिंग दाशिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ
北京大兴国际机场
आहसंवि: PKXआप्रविको: ZBAD
WMO:
PKX is located in चीन
PKX
PKX
चीनमधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकार जाहीर
कोण्या शहरास सेवा बीजिंग
हब एर चायना
चायना ईस्टर्न एरलाइन्स
चायना सदर्न एरलाइन्स
समुद्रसपाटीपासून उंची ९८ फू / ३० मी
गुणक (भौगोलिक) 39°30′33″N 116°24′38″E / 39.50917°N 116.41056°E / 39.50917; 116.41056
सांख्यिकी (२०१९)
एकूण प्रवासी ३१,३८,०००

बीजिंग दाशिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: PKXआप्रविको: ZBAD) हा चीन देशाच्या बीजिंग शहरामधील दोन प्रमुख विमानतळांपैकी एक आहे. २०१९ साली वाहतूकीस खुला करण्यात आलेला हा विमानतळ बीजिंग शहराच्या ५० किमी दक्षिणेस स्थित असून बीजिंग शहरासोबतच तो त्यांजिन शहर व हपै प्रांतालाही विमानसेवा पुरवतो. सुमारे १,१४० कोटी अमेरिकन डॉलर्स इतका खर्च करून बांधण्यात आलेल्या ह्या विमानतळाची इमारत (टर्मिनल) जगातील सर्वात मोठी आहे. ह्या टर्मिनलचे क्षेत्रफळ तब्बल ७५ लाख वर्ग फूट इतके आहे.

बीजिंग राजधानी आंतरराष्ट्रीय विमानतळ ह्या बीजिंग शहरातील प्रमुख विमानतळावरील प्रचंड वाहतूकीचा ताण कमी करण्यासाठी चीन सरकारने २०१९ साली बीजिंग शहराच्या ५० किमी दक्षिणेस बीजिंग दाशिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधला. हे दोन्ही विमानतळ बीजिंग शहरासोबत बीजिंग सबवेच्या विमानतळ मर्गिकेद्वारे जोडले गेले आहेत.

बाह्य दुवे

[संपादन]