Nothing Special   »   [go: up one dir, main page]

Chrome आणि Android वरील प्रायव्हसी सॅंडबाॅक्स या नवीन उपक्रमाद्वारे लोकांच्या गोपनीयतेचे आणखी चांगल्या प्रकारे ऑनलाइन संरक्षण करण्याच्या उद्देशाने Google जाहिरात सेवा या डिजिटल जाहिरातींचे वितरण आणि मापन यांना सपोर्ट करण्यासाठी नवीन मार्गांसह प्रयोग करत आहेत. Chrome किंवा Android मध्ये संबंधित प्रायव्हसी सॅंडबाॅक्स सेटिंग्ज सुरू केलेल्या वापरकर्त्यांना त्यांच्या ब्राउझर किंवा मोबाइल डिव्हाइसवर Google च्या जाहिरात सेवांवरून विषय अथवा संरक्षित प्रेक्षक यांच्या स्टोअर केलेल्या डेटानुसार संबंधित जाहिराती दिसू शकतात. Google च्या जाहिरात सेवा त्यांच्या ब्राउझर किंवा मोबाइल डिव्हाइसवर स्टोअर केलेला ॲट्रिब्यूशन अहवाल डेटा वापरून जाहिरातीचा परफॉर्मन्सदेखील मोजू शकतात. प्रायव्हसी सॅंडबाॅक्स याविषयी अधिक माहिती.

आमच्या सेवा वापरणाऱ्या भागीदार साइट किंवा ॲप्सवरील माहिती Google कशी वापरते

अनेक वेबसाइट आणि ॲप्स त्यांचा आशय सुधारण्यासाठी आणि तो मोफत ठेवण्यासाठी Google सेवा वापरतात. या साइट आणि ॲप्स आमच्या सेवा एकत्रित करतात तेव्हा, त्या Google सोबत माहिती शेअर करतात.

उदाहरणार्थ, तुम्ही AdSense सारख्या जाहिरात सेवा वापरणाऱ्या, Google Analytics सारखी विश्लेषण टूल समाविष्ट करणाऱ्या किंवा YouTube वरील व्हिडिओ आशय एम्बेड करणाऱ्या वेबसाइटला भेट देता तेव्हा, तुमचा वेब ब्राउझर काही माहिती आपोआप Google ला पाठवतो. यामध्ये तुम्ही भेट देत असलेल्या पेजच्या URL चा किंवा तुमच्या आयपी ॲड्रेसचा समावेश असतो. आम्ही तुमच्या ब्राउझरवर कुकीज सेटदेखील करू शकतो किंवा तेथे आधीच असलेल्या कुकीज रीड करू शकतो. Google जाहिरात सेवा वापरणारी ॲप्सदेखील Google सोबत माहिती शेअर करतात, जसे की ॲपचे नाव आणि जाहिरातींसाठी युनिक आयडेंटिफायर.

साइट आणि ॲप्सनी शेअर केलेली माहिती Google आमच्या सेवा देण्यासाठी, त्यांची देखभाल करण्यासाठी आणि त्या सुधारण्यासाठी, नवीन सेवा डेव्हलप करण्यासाठी, जाहिरातींच्या परिणामकारकतेचे मोजमाप करण्यासाठी, फसवणूक आणि गैरवापरापासून संरक्षण करण्यासाठी आणि तुम्ही Google वर आणि आमच्या भागीदारांच्या साइट आणि ॲप्सवर पाहत असलेला आशय आणि जाहिराती पर्सनलाइझ करण्यासाठी वापरते. यांपैकी प्रत्येक उद्देशासाठी आम्ही डेटावर कशी प्रक्रिया करतो याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आमचे गोपनीयता धोरण पहा आणि Google जाहिराती, जाहिरातींच्या संदर्भात तुमची माहिती कशी वापरली जाते आणि ही माहिती Google किती काळ स्टोअर करते याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आमचे जाहिरात पेज पहा.

आमचे गोपनीयता धोरण तुमच्या माहितीवर प्रक्रिया करण्यासाठी Google घेत असलेल्या कायदेशीर कारणांचे स्पष्टीकरण देते — उदाहरणार्थ, आम्ही तुमच्या संमतीने तुमच्या माहितीवर प्रक्रिया करू शकतो किंवा आमच्या वापरकर्त्यांच्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी आमच्या सेवा पुरवणे, त्यांची देखभाल करणे आणि त्यांच्यात सुधारणा करणे यांसारख्या कायदेशीर हितसंबंधांचा पाठपुरावा करू शकतो.

कधीकधी, साइट आणि अ‍ॅप्सद्वारे आमच्याशी शेअर केलेल्या माहितीवर प्रक्रिया केली जात असते तेव्हा Google ला तुमच्या माहितीवर प्रक्रिया करण्याची अनुमती देण्यापूर्वी त्या साइट व अ‍ॅप्स तुमची संमती मागतील. उदाहरणार्थ, साइट गोळा करत असलेल्या माहितीवर Google ने प्रक्रिया करण्यासाठी त्याची संमती घेण्याकरिता त्या साइटवर बॅनर दिसू शकतो. असे होईल तेव्हा, Google गोपनीयता धोरण यामध्ये वर्णन केलेल्या कायदेशीर कारणांऐवजी तुम्ही साइट किंवा अ‍ॅपला दिलेल्या संमतीमध्ये वर्णन केलेल्या उद्देशांना आम्ही प्राधान्य देऊ. तुम्हाला तुमची संमती बदलायची किंवा मागे घ्यायची असल्यास, त्यासाठी तुम्ही संबंधित साइट किंवा अ‍ॅपला भेट देणे आवश्यक आहे.

जाहिरात पर्सनलायझेशन

जाहिरात पर्सनलायझेशन चालू केलेले असल्यास, Google तुमची माहिती तुमच्या जाहिराती तुमच्यासाठी आणखी उपयुक्त बनवण्यासाठी वापरेल. उदाहरणार्थ, माउंटन बाइकची विक्री करणारी एखादी वेबसाइट Google च्या जाहिरात सेवा वापरू शकते. तुम्ही त्या साइटला भेट दिल्यानंतर, तुम्हाला Google कडून दिल्या जाणाऱ्या जाहिराती दाखवणाऱ्या एखाद्या वेगळ्या साइटवर माउंटन बाइकची जाहिरात दिसू शकेल.

जाहिरात पर्सनलायझेशन बंद असल्यास, जाहिरात प्रोफाइल तयार करण्यासाठी किंवा Google तुम्हाला दाखवत असलेल्या जाहिराती पर्सनलाइझ करण्यासाठी Google तुमची माहिती संग्रहित करणार नाही किंवा वापरणार नाही. तुम्हाला तरीही जाहिराती दिसतील, परंतु कदाचित त्या तेवढ्या उपयुक्त असणार नाहीत. जाहिराती तरीही वेबसाइट किंवा ॲपवर तुम्ही पाहत असलेले विषय, तुमच्या सध्याच्या शोध संज्ञा किंवा तुमचे साधारण स्थान यांवर आधारित असू शकतात, परंतु त्या तुम्हाला कशात रस आहे, शोध इतिहास किंवा ब्राउझिंग इतिहास यांवर आधारित नसतील. तुमची माहिती तरीही वर उल्लेख केलेल्या इतर उद्देशांसाठी वापरली जाऊ शकते, जसे की जाहिरातींच्या परिणामकारकतेचे मोजमाप करणे आणि फसवणूक आणि गैरवापरापासून संरक्षण करणे.

तुम्ही Google सेवा वापरणार्‍या वेबसाइट किंवा अ‍ॅपशी सुसंवाद साधता तेव्हा, Google सह जाहिरात पुरवणार्‍यांकडून तुम्ही पर्सनलाइझ केलेल्या जाहिराती पाहू इच्छिता का हे निवडण्यासाठी तुम्हाला विचारले जाईल. तुमची निवड काहीही असली तरीही, तुमची जाहिरात पर्सनलाझेशन सेटिंंग बंद असल्यास किंवा तुमचे खाते पर्सनलाइझ केलेल्या जाहिरातींसाठी अपात्र असल्यास तुम्ही पाहत असलेल्या जाहिराती Google पर्सनलाइझ करणार नाही.

तुम्हाला जाहिराती दाखवण्यासाठी आम्ही कोणती माहिती वापरतो ते तुम्ही तुमच्या जाहिरात सेटिंग्ज ला भेट देऊन पाहू आणि नियंत्रित करू शकता.

Google ने या साइट आणि ॲप्सवरून गोळा केलेली माहिती तुम्ही कशी नियंत्रित करू शकता

तुम्ही Google सेवा वापरणाऱ्या साइट आणि ॲप्सना भेट देता किंवा त्यांच्याशी परस्परसंवाद साधता तेव्हा तुमचे डिव्हाइस शेअर करत असलेली माहिती तुम्ही कशी नियंत्रित करू शकता त्याचे हे काही मार्ग आहेत:

  • तुम्ही Google सेवांवर (जसे की Google शोध किंवा YouTube) किंवा Google जाहिरात सेवा वापरणाऱ्या Google नसलेल्या साइट आणि ॲप्सवर पाहत असलेल्या जाहिराती नियंत्रित करण्यात तुम्हाला जाहिरात सेटिंग्ज मदत करते. तुम्ही जाहिराती कशा पर्सनलाइझ केल्या जातात ते जाणून घेणे, जाहिरात पर्सनलायझेशनची निवड रद्द करणे आणि विशिष्ट जाहिरातदारांना ब्लॉक करणे हेदेखील करू शकता.
  • तुम्ही तुमच्या Google खात्यात साइन इन केलेले असल्यास आणि तुमच्या खाते सेटिंग्जवर अवलंबून, माझी ॲक्टिव्हिटी तुम्हाला तुम्ही Google सेवा वापरता तेव्हा तयार होत असलेल्या डेटाचे परीक्षण करू देते आणि तो नियंत्रित करू देते, ज्यामध्ये तुम्ही भेट दिलेल्या साइट आणि ॲप्सवरून आम्ही गोळा करत असलेल्या माहितीचा समावेश आहे. तुम्ही तारीख आणि विषयानुसार ब्राउझ करू शकता आणि तुमच्या ॲक्टिव्हिटीचा काही भाग किंवा ती संपूर्ण हटवू शकता.
  • भेट देणारे त्यांच्या साइट किंवा ॲप्सशी कसे समरस होतात हे समजून घेण्यासाठी अनेक वेबसाइट आणि ॲप्स Google Analytics वापरतात. तुम्हाला तुमच्या ब्राउझरमध्ये Analytics वापरलेले नको नसल्यास, तुम्ही Google Analytics ब्राउझर ॲड-ऑन इंस्टॉल करू शकता. Google Analytics आणि गोपनीयता याविषयी अधिक जाणून घ्या.
  • Chrome मधील गुप्त मोड वेबपेज आणि फायलींची तुमच्या ब्राउझरमध्ये किंवा खाते इतिहासामध्ये नोंद न करता तुम्हाला वेब ब्राउझ करू देतो (तुम्ही साइन इन करणे न निवडल्यास). तुम्ही तुमच्या सर्व गुप्त विंडो आणि टॅब बंद केल्यानंतर कुकीज हटवल्या जातात आणि तुम्ही तुमचे बुकमार्क आणि सेटिंग्ज हटवेपर्यंत ते स्टोअर केले जातात. कुकीज विषयी अधिक जाणून घ्या. Chrome मध्ये गुप्त मोड किंवा इतर खाजगी ब्राउझिंग मोड वापरल्याने तुम्ही Google सेवा वापरणाऱ्या वेबसाइटना भेट देता, तेव्हा डेटाचा संग्रह रोखला जात नाही आणि तुम्ही हे ब्राउझर वापरून वेबसाइटना भेट देता, तेव्हा Google तरीही डेटा गोळा करू शकते.
  • Chrome सह अनेक ब्राउझर तुम्हाला तृतीय पक्ष कुकीज ब्लॉक करू देतात. तुम्ही तुमच्या ब्राउझरमधील कोणत्याही सद्य कुकीजदेखील साफ करू शकता. Chrome मध्ये कुकीज व्यवस्थापित करणे याविषयी अधिक जाणून घ्या.
Google Apps
मुख्य मेनू