Nothing Special   »   [go: up one dir, main page]

Jump to content

विकिपीडिया:विकिसुट्टी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विकिसुट्टी, विकिआराम, विकिविश्रांती किंवा विकिरजा म्हणजे असा काळ की, जेव्हा सदस्य विकिपीडिया हून दूर राहतात, आणि हा काळ छोटासाच असणे अपेक्षित असते. इतर सदस्यांच्या अस्तित्वाने अनेकांना वेगवेगळ्या स्तरावर त्रास होतो, काही सदस्यांना ह्या त्रासातून बाहेर पडणे सोपे पडते, काहींना त्याचा खूपच त्रास होतो आणि मग ते सतत ऑनलाईन जाऊन फक्त तपासण्या साठीच, की काय घडते आहे, पुन्हा-पुन्हा अलीकडील बदल तपासत राहतात.

विकिवर होणाऱ्या त्रासाची पातळी वेगवेगळी असू शकते शिवाय कधी-कधी ती खूपच त्रासदायक असू शकते, त्यामधून काही जुने व अनुभवी सदस्य स्वत:हून विकिसुट्टी घेतात आणि आपल्याला त्यांचे त्यांच्या ह्या क्षमतेबद्दल कौतुक केले पाहिजे. परंतु, काही सदस्यांना मात्र हे शक्य होत नाही आणि मग इतरांच्या त्रासात ते चुका करुन इतके गोत्यात येतात की त्यांना सक्तीची विकिसुट्टी घ्यावी लागते. आपल्यापैकी कुणावरही ही वेळ येऊ देऊ नका आणि म्हणूनच योग्य वेळीच विकिसुट्टी घ्या. विकिवेड्या सदस्यांना अशा सक्तीच्या विकिसुट्टी घेण्याची वेळ येण्याची शक्यता सर्वात जास्त असते, त्यामुळे त्यांनी ह्याबाबत जरा जास्तच सावध रहावे.

विकिसुट्टीसाठीचा साचा

[संपादन]

विकिसुट्टीवर जाताना सदस्यांना हा साचा आपल्या सदस्य पानावर लावता येईल.

कधी घ्याल विकिसुट्टी?

[संपादन]
शांततेची गोळी दर काही दिवसांनी एकदा घेणे आवश्यक आहे!
वेड्यासारखी अगणित संपादने केल्यावर आपल्याला ह्या विकिमाऊ सारख्या आरामाची नक्कीच गरज आहे.
विकिवरील सदस्य आपली संपादने आणि आयुष्य यातील तोल सांभाळताना.
  • जर तुम्ही आरामासाठी सुट्टीवर जात असाल तर,
  • जर तुम्ही विद्यार्थी असाल आणि तुमच्या परिक्षा जवळ आल्या असतील तर,
  • एकतर तुम्ही लग्न करणार असाल किंवा घटस्फोट घेणार असाल,
  • तुमच्या आसपासच्या वातावरणामुळे तुम्ही अस्वस्थ असाल तर,
  • जर तुमच्या कामाकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असेल तर,
  • तुमच्या पालक म्हणून असलेल्या जबाबदारीमधे जर दुर्लक्ष होत असेल तर,
  • जर तुम्हाला एखादा नविन व्हिडीयो गेम मिळाला असेल ज्यावर तुम्हांला लक्ष देणे महत्त्वाचे आहे,
  • जर तुम्हांला इतर सर्वच सदस्य सद्भावना गृहित धरत नाहीत असे सतत वाटत असेल तर,
  • तुम्ही इतके थकलेले आहात कि, त्याचा तुमच्या संपादनांवर परिणाम होऊ लागला आहे,
  • जर तुम्हांला नविन प्रियकर किंवा प्रेयसी मिळाली आहे,
  • तुमच्या प्रियकर/प्रेयसीची अशी इच्छा आहे की, तुम्ही त्यांच्याबरोबर जास्त वेळ घालवावा,
  • जर तुमचा नुकताच प्रेमभंग झालेला असेल तर,
  • जर तुम्हांला नविन जोब/काम शोधायचे असेल तर,
  • जर तुम्हांला आत्ताचा जॉब हातातून घालवायचा नसेल तर,
  • तुम्ही तुमच्या व्यवसायाकडे, तुमच्या ग्राहकांकडे लक्ष देणे आवश्यक असेल तर,
  • तुम्हांला ॲडमिनटायटीस झाला आहे असे लक्षात येताच किंवा इतरांनी दाखवून दिल्यास,
  • तुम्ही सतत उल्लेखनीयता नसलेले लेख बनवत असाल, किंवा प्रताधिकार भंग करत असाल तर,
  • तुम्हांला असलेला विकिताण तुम्हांला कुठलेच काम करु देत नाहीये,
  • जर तुम्हांला कायमचे अवरुद्ध केले गेले असेल तर,
  • जर तुम्हांला सतत, अलिकडचे बदल बघावेसे वाटत असेल, आणि न बघितल्यास तुम्ही बैचेन होत असाल तुमच्या प्रियकर/प्रेयसीवर निष्कारण चिडचिड करत असाल,
  • तुम्हांला असे वाटू लागले आहे की, तुम्ही दिलेले योगदान फुकट गेले आहे, विकिपीडियावर योगदान देऊन काही उपयोग झालेला नाहीये, तर तुम्हांला विकिसुट्टीची सर्वात जास्त गरज आहे,
  • इतरांनवर अधिकार आणि हुकूम गाजवणे आणि सतत इतरांची संपादने करण्यापासून अडवणूक करण्यातून तुम्हांला आसूरी आनंद मिळवण्यापेक्षाही बाहेर खरे-खरे जग आहे हे जेव्हा तुमच्या लक्षात येईल तेव्हा,
  • तुम्ही इतर सदस्यांनी केलेला उत्पात उलटवत असाल, आणि सतत उलटवत असाल, तरीही तुम्ही क्लूबॉट एन जी(इंग्रजीवरील उत्पात परस्पर उलटवणारा सांगकाम्या!) पेक्षा कमी गतीने हे काम केल्याबद्दल जर तुम्ही दु:खी होत असाल तर,