Nothing Special   »   [go: up one dir, main page]

Jump to content

फुझुली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बाकूमधील संग्रहालयामध्ये ठेवलेले फुझुलीचे चित्र

फुझुली (अरबी: فضولی; अझरबैजानी: Füzuli; इ.स. १४९४ - इ.स. १५५६) हा १०व्या शतकामधील एक मध्य युगीन कवी होता. ह्याचे खरे नाव मोहम्मद बिन सुलेमान असे होते. अझरबैजानी वाग्मयामध्ये फुझुलीचे योगदान अद्वितीय मानले जाते. ओस्मानी साम्राज्यामधील सर्वात लोकप्रिय साहित्यिकांपैकी एक असलेल्या फुझुलीने अझरबैजानी, अरबी व फारसी ह्या तीन भाषांमधून कविता लिहिल्या आहेत. काव्यासोबत फुझुलीचा गणित व खगोलशास्त्रामध्ये देखील अभ्यास होता.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत