Nothing Special   »   [go: up one dir, main page]

Jump to content

गुजरातचे मुख्यमंत्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गुजरातचे मुख्यमंत्री
ગુજરાત રાજ્યના મુખ્યમંત્રી
Chief Minister of State of Gujarat
गुजरातची राजमुद्रा
भारतीय ध्वजचिन्ह
विद्यमान
भूपेंद्रभाई पटेल
(भारतीय जनता पक्ष)

१३ सप्टेंबर २०२१ पासून
शैली राज्यसरकार प्रमुख
सदस्यता गुजरात विधानसभा
वरिष्ठ अधिकारी गुजरातचे राज्यपाल
मुख्यालय सचिवालय, गांधीनगर
नियुक्ती कर्ता गुजरातचे राज्यपाल
कालावधी ५ वर्ष
निर्मिती १ मे १९६०
पहिले पदधारक जीवराज मेहता
उपाधिकारी गुजरातचे उपमुख्यमंत्री

गुजरातचे मुख्यमंत्री हे भारताच्या गुजरात राज्याचे सरकारप्रमुख आहे. भारतीय संविधानानुसार राज्यप्रमुख जरी राज्यपाल असला तरी राज्याची सर्व सुत्रे व निर्णयक्षमता मुख्यमंत्र्याच्या व त्याच्या मंत्रीमंडळाच्या हातात असते. गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या राजकीय पक्षाला राज्यपाल सरकारस्थापनेसाठी आमंत्रित करतो. त्या पक्षाच्या विधिमंडळ समितीद्वारे मुख्यमंत्र्याची निवड केली जाते. बहुमत सिद्ध करून मुख्यमंत्री आपल्या पदावर पाच वर्षे राहू शकतो.

१ मे १९६० रोजच्या गुजरात राज्याच्या निर्मितीपासून आजवर १५ नेते मुख्यमंत्रीपदावर राहिले आहेत.

यादी

[संपादन]
पक्षांचे रंगसंकेत
क्रमांक नाव कार्यकाल प़क्ष कार्यकाळाचे दिवस संदर्भ
जीवराज नारायण मेहता
(अमरेली)
१ मे १९६० ३ मार्च १९६२ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १२३८ दिवस First (१९६०-६१) []
३ मार्च १९६२ १९ सप्टेंबर १९६३ Second (१९६२-६६) []
बळवंतराय मेहता
१९ सप्टेंबर १९६३ २० सप्टेंबर १९६५ ७३३ दिवस
हितेंद्र कन्हैयालाल देसाई
(ओलपाड)
२० सप्टेंबर १९६५ ३ एप्रिल १९६७ २०६२ दिवस
३ एप्रिल १९६७ १२ मे १९७१ तिसरी(१९६७-७१)
रिकामे
(राष्ट्रपती राजवट)
१२ मे १९७१ १७ मार्च १९७२ N/A विसर्जित
घनश्याम ओझा
(दहेगाम)
१७ मार्च १९७२ १७ जुलै १९७३ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ४८८ दिवस चौथी (१९७२-७४)
चिमणभाई पटेल
(संखेडा)
१८ जुलै १९७३ ९ फेब्रुवारी १९७४ २०७ दिवस
रिकामे
(राष्ट्रपती राजवट)
९ फेब्रुवारी १९७४ १८ जून १९७५ N/A विसर्जित
बाबूभाई जशभाई पटेल
(साबरमती)
१८ जून १९७५ १२ मार्च १९७६ जनता आघाडी
(भाराकॉं (सं) + भाजसं + भालोद + समता)
२११ दिवस पाचवी (१९७५-८०)
रिकामे
(राष्ट्रपती राजवट)
१२ मार्च १९७६ २४ डिसेंबर १९७६ N/A
माधवसिंह सोळंकी
(भादरण)
२४ डिसेंबर १९७६ १० एप्रिल १९७७ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १०८ दिवस
(६) बाबूभाई जशभाई पटेल
(साबरमती)
११ एप्रिल १९७७ १७ फेब्रुवारी १९८० जनता पक्ष १०४२ दिवस
(एकूण: १२५३ दिवस)
रिकामे
(राष्ट्रपती राजवट)
१७ फेब्रुवारी १९८० ७ जून १९८० N/A विसर्जित
(७) माधवसिंह सोळंकी
(भद्रन)
७ जून १९८० १० मार्च १९८५ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १८५६ दिवस सहावी (१९८०-८५)
११ मार्च १९८५ ६ जुलै १९८५ सातवी (१९८५-९०)
8 अमरसिंह चौधरी
(व्यारा) अ.ज.
६ जुलै १९८५ ९ डिसेंबर १९८९ १६१८ दिवस
(७) माधवसिंह सोळंकी
(भद्रन)
१० डिसेंबर १९८९ ४ मार्च १९९० ८५ दिवस
(एकूण: २०४९ दिवस)
(५) चिमणभाई पटेल
(उंझा)
४ मार्च १९९० २५ ऑक्टोबर १९९० जद + भाजप १४४५ दिवस
(एकूण : १६५२ दिवस)
आठवी (१९९०-९५)
२५ ऑक्टोबर १९९० १७ फेब्रुवारी १९९४ जद(गु) + भाराकॉं
छबिलदास मेहता
(महुवा)
१७ फेब्रुवारी १९९४ १४ मार्च १९९५ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ३९१ दिवस
१० केशुभाई पटेल
(विसावदर)
१४ मार्च १९९५ २१ ऑक्टोबर १९९५ भारतीय जनता पक्ष २२१ दिवस नववी (१९९५-९८)
११ सुरेश मेहता
(मांडवी)
२१ ऑक्टोबर १९९५ १९ सप्टेंबर १९९६ ३३४ दिवस
रिकामे
(राष्ट्रपती राजवट)
१९ सप्टेंबर १९९६ २३ ऑक्टोबर १९९६ N/A
१२ शंकरसिंह वाघेला
(राधनपूर)
२३ ऑक्टोबर १९९६ २७ ऑक्टोबर १९९७ राष्ट्रीय जनता पक्ष
+ भाराकॉं
३७० दिवस
१३ दिलीप पारीख
((धंधुका))
२८ ऑक्टोबर १९९७ ४ मार्च १९९८ १२८ दिवस
(१०) केशुभाई पटेल
(विसावदर)
४ मार्च १९९८ ६ ऑक्टोबर २००१ भारतीय जनता पक्ष १३१२ दिवस
(एकूणः १५३३ दिवस)
दहावी (१९९८-२००२)
१४ नरेंद्र मोदी
(राजकोट-२)
७ ऑक्टोबर २००१ २२ डिसेंबर २००२ 4610 दिवस
नरेंद्र मोदी
मणीनगर)
२२ डिसेंबर २००२ २२ डिसेंबर २००७ अकरावी (२००२-०७)
२३ डिसेंबर २००७ २० डिसेंबर २०१२ बारावी (२००७-१२)
२० डिसेंबर २०१२ २२ मे २०१४ तेरावी (२०१२-१७)
१५ आनंदीबेन पटेल
(घाटलोडिया)
२२ मे २०१४ ७ ऑगस्ट २०१६ 3824 दिवस
१६ विजय रूपाणी
(राजकोट पश्चिम)
७ ऑगस्ट २०१६ १३ सप्टेंबर २०२१ 1863 दिवस
१७ भूपेंद्रभाई पटेल
(घाटलोडिया)
१३ सप्टेंबर २०२१ पदस्थ &0000000000000003.000000३ वर्षे, &0000000000000057.000000५७ दिवस

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]