टेक्सास इन्स्ट्रुमेंट्स
Appearance
(टेक्सास इन्स्ट्रुमेन्ट्स या पानावरून पुनर्निर्देशित)
ब्रीदवाक्य | टेक्नॉलॉजी फॉर इनोवेटर्स |
---|---|
प्रकार | सार्वजनिक |
उद्योग क्षेत्र | अर्धवाहक, इलेक्ट्रॉनिकी |
स्थापना |
इ.स. १९३० (’जिओफिजिकल सर्व्हिस इन्कॉर्पोरेटेड’ नावाने) इ.स. १९४७ (’टेक्सास इन्स्ट्रुमेंट्स’ नावाने) |
मुख्यालय |
डॅलस, टेक्सास, अमेरिकेची संयुक्त संस्थाने डॅलस, टेक्सास |
उत्पादने | इंटिग्रेटेड सर्किट, डिजिटल सिग्नल प्रोसेसर |
महसूली उत्पन्न | १४.२६ अब्ज अमेरिकन डॉलर (इ.स. २००६) |
कर्मचारी | ३०,९८६ (इ.स. २००७) |
संकेतस्थळ | www.ti.com |
टेक्सास इन्स्ट्रुमेंट्स (लघुरूप: टी.आय. ; इंग्लिश: Texas Instruments Inc., टेक्सास इन्स्ट्रूमेंट्स इन्कॉ. ;) ही डॅलस, अमेरिका येथे मुख्यालय असलेली, अर्धवाहक व संगणक तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी आहे. इंटेल, सॅमसंग, तोशिबा या कंपन्यांपाठोपाठ अर्धवाहक उत्पादन क्षेत्रात टेक्सास इन्स्ट्रूमेंट्स जगात चौथ्या क्रमांकाची कंपनी असून मोबाइल हॅंडसेटांसाठीच्या अर्धवाहक चिप उत्पादनात ती क्वालकॉम कंपनीखालोखाल दुसऱ्या क्रमांकावर आणि डिजिटल सिग्नल प्रोसेसर व ॲनालॉग अर्धवाहक उत्पादनात जगभरात अव्वल क्रमांकावर आहे [१].
या कंपनीचे मुख्यालय डॅलसमध्ये असून रिचर्डसन येथे मोठे प्रांगण आहे.
संदर्भ
[संपादन]- ^ "डेटाबीन्स - इ.स. २००९ अॅनालॉग अर्धवाहक उत्पादन क्षेत्रातील बाजारहिस्से" (इंग्लिश भाषेत). 2013-01-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-01-01 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- अधिकृत संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर)