Nothing Special   »   [go: up one dir, main page]

Jump to content

एरंड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
" | एरंड

" | शास्त्रीय वर्गीकरण
कुळ: Euphorbiaceae

एरंड (इंग्लिश : कॕस्टर् बीन् प्लॕन्ट् / Castor bean plant; लॅटिन : Ricinus communis) ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. एरंडाच्या बियांना एरंडी म्हणतात. बियांपासून तेल काढतात.

उत्पत्तीस्थान

[संपादन]

भारत, चीन, ब्राझील, थायलंड, फिलिपाईन्स, दक्षिण आफ्रिका आदी देशात एरंड ही वनस्पती प्रामुख्याने आढळते. जगात एरंडाचे सर्वाधिक उत्पादन भारतात होते. भारतातील गुजरात, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि राजस्थान या राज्यात एरंडाची लागवड प्रामुख्याने केली जाते.

वर्णन

[संपादन]

एरंड हे झाड साधारण २ ते ४ मीटरपर्यंत उंच वाढणारे असते. हे झाड रानटी अवस्थेत आढळते तसेच याची शेतात लागवड केली जाते. याची पाने, बिया, मूळ आणि तेल यांचा औषधी उपयोग केला जातो.
पाने - हिरवट-तांबड्या रंगाची बोटांप्रमाणे लांब आणि टोकदार असतात.
फळ - दोन भागांनी बनलेले, आकाराने गोलसर आणि त्यावर मऊ काटे असतात.
बिया - काळ्या धुरकट रंगाची त्यावर पांढऱ्या रेषा, ठिपके असतात. यांना एरंडी म्हणतात.

प्रकार

[संपादन]

रंगावरून प्रकार

[संपादन]
  1. पांढरा - यात दोन उपप्रकार आहेत अ) लहान - याच्या बियांचे तेल व मूळ औषधांत वापरतात. ब) मोठा - याची पाने औषधात वापरतात.
  2. तांबडा - याचे तेल अधिक तीव्र असते, विशेष औषधांत वापरतात.

आयुष्यानुसार प्रकार

[संपादन]
  1. वर्षायू - साधारण एक वर्षापर्यंत जगणारे लहान आकाराचे झाड.
  2. दीर्घवर्षायू - बरीच वर्षे जगणारे, मोठ्या आकाराचे बी व फळे असणारे झाड.

चवीनुसार प्रकार

[संपादन]
  1. गोड.
  2. कडू.

उपयोग

[संपादन]

आयुर्वेदात एरंडाचा उपयोग होतो.

वातविकार, कावीळ, दीर्घकालीन बद्धकोष्ठता, मूळव्याध, अजीर्ण, आमवात-संधिवात, उदरशूल, योनिशूल, मेदोरोग, हत्तीरोग, सूज येणे, कृमि होणे, पायाची आग होणे, इ. अनेक विकारांवर एरंडचा औषधी उपयोग केल्या जातो. प्राचीन काळी, एरंडेल तेलाचा वापर दिव्यांना इंधन देण्यासाठी, डोंळयांची जळजळ यासारख्या विविध आजारांवर उपचार करण्यासाठी आणि गर्भवती महिलांना प्रसूतीसाठी देखील केला जात असे एरंडाची पाने, बिया, तेल वगैरे अति प्रमाणात किंवा जास्त काळ सेवन केल्यास उलट्या होणे, जुलाब होणे, आमाशय व आतड्यांना अशक्तपणा येण्याचे दुष्परिणाम दिसून येतात.

  • वातनाशक, वेदनाशामक,सुजनाशक असल्याने एरंडाचे तेल चोळण्यासाठी वापरतात.
  • दुखणाऱ्या भागावर एरंडाची पने गरम करून बांधतात.
  • एरंडाच्या बिया, गाईचे तूप अ भीमसेन कापूर यांच्या योग्य मिश्रणाने तयार केलेले काजळ डोळे आल्यास वापरतात.

एरंडापासून बनणारी औषधे

[संपादन]
  • एरंडेल तेलावर परतलेले हिरडा चूर्ण म्हणजे गंधर्व हरितकी. एरंडाची पाने खूप खूप मुलायम म्हणजे गंधर्वाच्या तळहातासारखी असतात. म्हणून या चूर्णाला गंधर्व हरितकी चूर्ण असे नाव स्वाभाविकपणे पडले आहे.
  • एरंडपाक
  • एरंडाची लापशी : ज्यांना एरंडेल तेलाचा नॉशिया आहे त्यांच्यासाठी ताज्या एरंड बियांची साले काढून, त्या बिया दुधात वाटून थोडे साखर व तूप टाकून लापशी करतात.
  • एरंडेल तेलाने आतड्यातील श्लेष्मल त्वचेस मृदुपणा येतो व त्यामुळे मळाच्या गाठी सैल होऊन खाली निसटतात. एरंडेल तेलाचे कार्य लहान आतड्यावर होत असते.
  • एरंडेल तेलाबरोबर आल्याचा रस हे अनुपान आहे.
  • एरंडाच्या बियापासून तेल काढतात.
  • याचा उपयोग वेदनाशमक म्हणून केला जातो. खोकला, कफ,आमवात, मुतखडा,ताप अशा अनेक रोगांवर एरंडाचा उपयोग केला जातो. आयुर्वेदात सुद्धा एरंडाचा विशिष्ट मात्रेत उपयोग केला जातो.

इतर माहिती: एरंडाचा उपयोग इतर पदार्थनिर्मितीसाठी सुद्धा होतो; त्यामुळे एरंड या झाडाचे पांढरा व तांबडा असे दोन प्रकार आहेत. एक जोडधंदा ,म्हणून शेतकरी लोक एरंडाची लागवड करून, याचा उपयोग करतात.

चित्रदालन

[संपादन]

मोगली एरंड

[संपादन]

हे एक वेगळेच औषधी झाड आहे. याच्या खोडा-पानांना चीक असल्याने जनावरे याला तोंड लावत नाहीत. म्हणून मोगली एरंडाची (Jatropa curcus) झाडे कुंपणावर लावतात.

हे सुद्धा पहा

[संपादन]