Nothing Special   »   [go: up one dir, main page]

Jump to content

"अनंतराव थोपटे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: दृश्य संपादन Edit Check (references) activated Edit Check (references) declined (other) मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो शुद्धलेखन — अंक व शब्दामधील जागा काढली (अधिक माहिती); शुद्धलेखन — योग्य रकार (अधिक माहिती)
ओळ ५२: ओळ ५२:
अनंतराव थोपटेनी पुणे विद्यापीठातून जी.डी.सी आणि बी.ए ची पदवी घेतली. वयाच्या पंचविसव्या वर्षी म्हणजे १९७२ मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले.
अनंतराव थोपटेनी पुणे विद्यापीठातून जी.डी.सी आणि बी.ए ची पदवी घेतली. वयाच्या पंचविसव्या वर्षी म्हणजे १९७२ मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले.

इ.स. १९८३ मध्ये वसंतदादा पाटील यांनी त्यांना पहिल्यांदा राज्यमंत्रिपद दिले.आमदारकीच्या दुसर्‍याच टर्ममध्ये मंत्रिपद मिळालेल्या अनंतरावानी नंतर मागे वळून पाहिले नाही.दुग्धविकास, पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय, ग्रामविकास, कृषि, कामगार, परिवहन, पुनर्वसन, रोजगार हमी योजना, प्राथमिक शिक्षण, उच्च शिक्षण, फलोत्पादन, तंत्रशिक्षण, संसदीय कार्य, विधिमंडळ कामकाज अशा अनेक महत्त्वाच्या खात्यांचा कारभार त्यांनी कार्यक्षमपणे केला.
इ.स. १९८३ मध्ये वसंतदादा पाटील यांनी त्यांना पहिल्यांदा राज्यमंत्रिपद दिले.आमदारकीच्या दुसऱ्याच टर्ममध्ये मंत्रिपद मिळालेल्या अनंतरावानी नंतर मागे वळून पाहिले नाही.दुग्धविकास, पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय, ग्रामविकास, कृषि, कामगार, परिवहन, पुनर्वसन, रोजगार हमी योजना, प्राथमिक शिक्षण, उच्च शिक्षण, फलोत्पादन, तंत्रशिक्षण, संसदीय कार्य, विधिमंडळ कामकाज अशा अनेक महत्त्वाच्या खात्यांचा कारभार त्यांनी कार्यक्षमपणे केला.

• ११ जानेवारी १९३३
• ११ जानेवारी १९३३
ओळ ६२: ओळ ६२:
•राजकीय प्रवासः इ.स १९७२ मध्ये पहिल्यांदा आमदार झाले.
•राजकीय प्रवासः इ.स १९७२ मध्ये पहिल्यांदा आमदार झाले.

• इ.स. १९७२पासून इ.स. १९९९पर्यंत आमदार, इ.स. १९९९च्या विधानसभा निवडणुकीत पराभव. पुन्हा इ.स २००४ ते २००९ पर्यंत आमदार
• इ.स. १९७२पासून इ.स. १९९९पर्यंत आमदार, इ.स. १९९९ च्या विधानसभा निवडणुकीत पराभव. पुन्हा इ.स २००४ ते २००९ पर्यंत आमदार

•इ.स. १९८६ ते इ.स. १९९५ या कालखंडात कॅबिनेट मंत्री.दुग्धविकास, पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय, ग्रामविकास, कृषि, कामगार, परिवहन, पुनर्वसन, रोजगार हमी योजना, प्राथमिक शिक्षण, उच्च शिक्षण, फलोत्पादन, तंत्रशिक्षण, विधिमंडळ कामकाज,संसदीय कार्य खात्याचा कारभार

१४:३५, १७ सप्टेंबर २०२४ ची आवृत्ती

अनंतराव थोपटे (११जानेवारी १९३३) हे एक भारतीय राजकारणी आहेत.भोर विधानसभा मतदारसंघातून ६ वेळा आमदार म्हणून विजयी झाले आहेत. अनंतराव थोपटे हे पुणे जिल्ह्यातील काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते. ते तब्बल १४ वर्षे राज्याच्या मंत्रिमंडळात त्यांनी मंत्री म्हणून काम केले.

अनंतराव थोपटे

महाराष्ट्राचे माजी शिक्षणमंत्री

विधानसभा सदस्य
भोर विधानसभा मतदारसंघ साठी
कार्यकाळ
१९७२ – १९७८
मागील शंकर भेलके
पुढील संपतराव जेधे
कार्यकाळ
१९८० – १९९९
मागील संपतराव जेधे
पुढील काशिनाथ खुटवड
कार्यकाळ
२००४ – २००९
मागील काशिनाथ खुटवड
पुढील संग्राम थोपटे

जन्म ११ जानेवारी, १९३३
हातनोशी,भोर पुणे
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय काँग्रेस पक्ष
वडील नारायणराव थोपटे
पत्नी निर्मला अनंतराव थोपटे
अपत्ये संग्राम अनंतराव थोपटे
निवास भोर
शिक्षण जी.डी.सी.आणि बी.ए.
गुरुकुल नौरोसजी वाडिया महाविद्यालय
सर परशुरामभाऊ महाविद्यालय
व्यवसाय राजकारणी
धर्म हिंदू

कारकीर्द

अनंतराव थोपटेनी पुणे विद्यापीठातून जी.डी.सी आणि बी.ए ची पदवी घेतली. वयाच्या पंचविसव्या वर्षी म्हणजे १९७२ मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले.

इ.स. १९८३ मध्ये वसंतदादा पाटील यांनी त्यांना पहिल्यांदा राज्यमंत्रिपद दिले.आमदारकीच्या दुसऱ्याच टर्ममध्ये मंत्रिपद मिळालेल्या अनंतरावानी नंतर मागे वळून पाहिले नाही.दुग्धविकास, पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय, ग्रामविकास, कृषि, कामगार, परिवहन, पुनर्वसन, रोजगार हमी योजना, प्राथमिक शिक्षण, उच्च शिक्षण, फलोत्पादन, तंत्रशिक्षण, संसदीय कार्य, विधिमंडळ कामकाज अशा अनेक महत्त्वाच्या खात्यांचा कारभार त्यांनी कार्यक्षमपणे केला.

• ११ जानेवारी १९३३

•जन्मगाव:हातनोशी, भोर पुणे

•शिक्षणः बी.ए आणि जी.डी.सी

•राजकीय प्रवासः इ.स १९७२ मध्ये पहिल्यांदा आमदार झाले.

• इ.स. १९७२पासून इ.स. १९९९पर्यंत आमदार, इ.स. १९९९ च्या विधानसभा निवडणुकीत पराभव. पुन्हा इ.स २००४ ते २००९ पर्यंत आमदार

•इ.स. १९८६ ते इ.स. १९९५ या कालखंडात कॅबिनेट मंत्री.दुग्धविकास, पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय, ग्रामविकास, कृषि, कामगार, परिवहन, पुनर्वसन, रोजगार हमी योजना, प्राथमिक शिक्षण, उच्च शिक्षण, फलोत्पादन, तंत्रशिक्षण, विधिमंडळ कामकाज,संसदीय कार्य खात्याचा कारभार

सहकार खात्यातील दिवस

अनंतराव थोपटे यांचा वयाच्या पंचविसाव्या वर्षीच सहकार क्षेत्राशी संबंध आला.ते सहायक तालुका सहकारी अधिकारी या पदावर शासकीय सेवेत रुजू झाले.1958 ते 1971 या कालखंडात त्यांनी शासकीय अधिकारी म्हणून सेवा बजावली.सहकार अधिकारी या पदाबरोबरच विविध संस्थामध्ये प्रमुख पदावर काम केले.वेल्हे तालुक्याचे गटविकास अधिकारी म्हणूनही त्यांनी कार्यभार सांभाळला.

निवडणूक लढविण्याचा निर्धार

मूळ पिंड कार्यकर्त्याचा असल्याने शासकीय नोकरीमध्ये थोपटे यांचे मन रमेना.म्हणून 1972 साली शासकीय सेवेचा राजीनामा देण्याचे धाडस यांनी केल आणि अपक्ष म्हणून विधानसभेची निवडणूक लढविली आणि निवडून आले.खऱ्या अर्थाने त्यांचा सहकार,सामाजिक आणि राजकीय कारकिर्दीस सुरुवात झाली.

शेतकऱ्यांसाठी लढा

थोपटे यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी कृषी व ग्रामीण विकास बँकेचे राज्य स्तरावरील संचालक म्हणून व जिल्हा स्तरावरील अध्यक्ष म्हणून 1980 ते 1982 च्या दरम्यान काम केले.भू-विकास बँक या नावाने ही बैंक आजही प्रचलित आहे. या कालखंडात थोपटे यांच्या नेतृत्वाखाली बँकेने कर्जवाटप करून योग्यवेळी शेतकऱ्यांची आर्थिक गरज भागविली.त्यामुळे शेतीमध्ये नगदी पिके घेऊन आणि शेतीपूरक व्यवसाय करून गरीब अशा शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारली.

राजकीय कारकिर्दीस सुरुवात

राजकीय कारकिर्दीस सुरुवात झाली. सुमारे 36 वर्षे भोर-वेल्हे या दोन तालुक्याचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले.तसेच 14 वर्षे विविध खात्याच्या मंत्रिपदाचा कार्यभार सांभाळत आपल्या अंगी असलेल्या अभ्यासू आणि अचूक निर्णयक्षमतेचा ठसा उमटिवला. या काळात त्यांनी जनतेचे प्रश्न सोडविले. म्हणूनच एक अभ्यासू ,कार्यालयीन कामकाजबरोबरच प्रशासकीय कामाची तंतोतंत माहिती असलले मंत्री अशी प्रतिमा सर्व अधिकार आणि कर्मचारी यांच्यामध्ये निर्माण झाली.

विविध खात्यांचा पदभार

अनंतरावाना अनेक खात्यांचा अनुभव होता. वसंतदादा पाटील, शिवाजीराव पाटील निलंगेकर, शंकरराव चव्हाण, शरद पवार आणि सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी मंत्री म्हणून काम पाहिले होते.

दुग्धविकास, पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय, ग्रामविकास, कृषि, कामगार, परिवहन, पुनर्वसन, रोजगार हमी योजना, प्राथमिक शिक्षण, उच्च शिक्षण, फलोत्पादन, तंत्रशिक्षण, संसदीय कार्य, विधिमंडळ कामकाज, महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष (मंत्री दर्जा) अशी विविध खाती त्यांनी भूषवली.

महानंदा डेअरीची स्थापना

थोपटे यांनी दुग्धविकास राज्यमंत्री आणि मंत्री म्हणून कार्यभार हाती घेतल्यानंतर कल्पकता आणि दूरदृष्टीच्या बळावर त्यांनी दूध उत्पादनास मोठ्या प्रमाणावर चालना दिली. त्यांनी त्यावेळी दूधाचा महापूर योजना कार्यान्वित केली. तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ स्थापन करण्यात त्यांचा वाटा होता. महानंद डेअरीचा प्रारंभ त्याच काळात झाला. या संस्थेचे पहिले अध्यक्षपद त्यांनी भूषविले.

दत्त दिगंबर वाहतूक संस्था

थोपटे यांनी दत्त दिगंबर सहकारी वाहतूक कामगार संस्था 1975 मध्ये स्थापन केली. भोर व वेल्हे तालुक्यात वाहन चालक आणि वाहक यांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती. दुसऱ्याच्या ट्रकवर काम करणाऱ्या सर्व वाहन चालक व वाहक यांना एकत्र करून या संस्थेचे सभासद केले. या सभासदांनी या संस्थेचा आधार घेऊन बँकांकडून अर्थसाहाय्य उपलब्ध करून दूध वाहतुकीसाठी टँकर घेतले आणि संस्थेमार्फत दुधाची वाहतूक टँकरद्वारा करण्यास सुरुवात केली. त्यांनी वाहतुकीच्या उत्पन्नातून घेतलेल्या कर्जाची परतफेड केली.

साखर कारखान्याचे स्वप्न

थोपटे यांनी 1988 सालच्या विजयादशमीच्या मुहूर्तावर राजगड सहकारी साखर कारखाना मर्या. अनंतनगर,निगडे, ता. भोर, जि. पुणे ची नोंदणी केली.1981 ते 1988 या प्रदीर्घ कालावधीपर्यंत कारखान्याच्या नोंदणीसाठी पाठपुरावा केल्यावर यश मिळाले.त्यावेळी भोर-वेल्हे तालुक्यासारख्या डोंगरी भागात साखर कारखाना उभा करून चालविणे धाडसाचे होते. या कारखान्यामुळे मोठ्या प्रमाणावर क्षेत्र ऊस लागवडीखाली आले.त्यामुळे तरुण वर्गास रोजगार उपलब्ध झाला.तालुक्यातील विशेषतः डोंगरी भागातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत झाली.

पराभवाचा धक्का

१९९९ साली काशिनाथ खुटवड यांनी विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव केला. हा त्यांच्या कारकिर्दीतला सर्वात मोठा हादरा होता.

संदर्भ

htt[]ps.://maharashtranayak.in/thaopatae-ananta-naaraayana

  1. ^ "थोपटे, अनंत नारायण". महाराष्ट्र नायक (इंग्रजी भाषेत). 2024-09-06 रोजी पाहिले.

[]

  1. ^ "Sangharsha Rajgadchya Mavlyacha". www.bookganga.com. 2024-09-06 रोजी पाहिले.